संदिग्ध अर्थाचे उखाणे येथे हे वाचायला मिळाले:

जात-संमेलनाला जायचं खरं तर पॅडीला फारसं पटलं नव्हतं. शाळा-कॉलेजच्या फॉर्मबाहेर त्याची जात कधी आली नव्हती पण इथं सगळं वेगळंच होतं. हॉस्टेलच्या खोलीत प्रवेश करताच रम्यानं कोण, कुठला, अमका नातेवाईक, तमकी सोयरीक असं करत शेवटी कोड क्रॅक केलाच. "म्हणजे तू आपल्यातलाच!" रम्यानं निर्णय जाहीर केला "सॅन्डी आपल्यातला नाही पण चॉईस नव्हता. त्याचे भाय-कॉन्टॅक्ट आहेत म्हणे. रॅगिंगच्या वेळी उपयोगी येतील म्हणाला. चल, आता आपल्या जातीचा मेळावा आहे आत्ता." डब्याबाहेर आलेला तुपाचा ओघळ बोटानं निपटून डब्यात ढकलावा तसं चापून चापून रम्यानं पोट पॅन्टमधे बसवलं. पॅडी ...
पुढे वाचा. : अपुर्णांकाची अवतरणे- |१/४।-रम्य ते अभयारण्य