सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:
मुन्नार हे केरळांत समुद्रसपाटीपासून ७ ते ८ हजार फुट उंचीवर आहे . कांही वेळा तेथील तपमान शुन्याच्या आसपासही असते . कोची पासून , रस्त्याने अंदाजे ४ ते ४.५ तास लागतात. संपूर्ण रस्ता उत्तम आहे . दोनही बाजूचे सौंदर्य देखणे आहे . समुद्र सपाटीला नारळी – केळीच्या बागा व चढाव सुरू झाला की अननस, कॉफी , कोको , काळी मिरी , रबर , वेलची , टॅपिओका , लवंग , दालचिनी वगैरेंच्या बागा दिसतात. बर्याच उंचीवर चहाचे मळे लागतात.