ही पद्धती बदलून एखाद्याची सृजनशीलता, हुशारी मोजण्याचा नवा निकष आपण तयार करू शकणार नाही काय? या मुलांना आपण असेच ताणाखाली राहायला लावणार काय? शिक्षण हे पुढच्या जीवनाला आधार देणारे, बळ देणारे असावे ते बलहीन करणारे नसावे यासाठी काय करता येईल?
कितीही अस्वस्थता आली तरी एकंदरित उपलब्ध साधनसंपत्तीच्या मानाने अतिजास्त लोकसंख्या या कारणाने ही स्पर्धा आवश्यक होऊन बसली आहे. तुम्ही १०/१० नसाल तरी बाकीचे असतील. आणि जर हजारो लोकांमधून मूठभर लोकांना संधी उपलब्ध होणार असतील, तर ते मूठभर कसे ना कसे निवडावे लागणारच.
चार वर्षाच्या वयात एव्हढी स्पर्धा, एव्हढा ताण योग्य नाही हे मला पटते. पण तुम्ही म्हणता तसे, तुम्ही काही न सांगता देखील तुमच्या लेकीने हे जाणले आहे की वर्गातल्या बाकी सगळ्यांएव्हढे तरी 'गुण' मिळवणे आवश्यक आहे. तिला हवा तसा आधार देणे हेच सध्याच्या काळात आवश्यक आहे. तुम्ही तिच्यावर कसलेही दोषारोप केले नाहीत, तू असे का लिहिलेस वगैरे पंचनामा केला नाहीत हे तुमचे कौतुक आहे. हाच दृष्टीकोन पुढची १२/ १५ वर्षे जपून ठेवावा लागणार आहे. तुम्हाला आणि लेकीला शुभेच्छा.