नस्ती उठाठेव येथे हे वाचायला मिळाले:

"व्हायचं असतं ते घडतंच' या म्हणीचा कधीकधी प्रत्यय येत असल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. परवाही असंच झालं. परवा म्हणजे गेल्या रविवारी. आई रत्नागिरीहून येणार होती. "मी स्वतः येईन रिक्षानं. तू कशाला झोपमोड करून येतोस,' असा तिला सल्ला. पण हा आज्ञाधारक, विनम्र पुत्र रात्री दीडला झोपून पुन्हा पहाटे पाचला तिला आणायला जाण्यासाठी सज्ज झाला. सकाळी बरोब्बर पाचचा गजर लावला आणि त्यानुसार (गजर तसाच बंद न करता) उठलोही. कार घेऊन जाऊन आईला आपल्या मुलाच्या गाडीचा आनंद घेतल्याचं कृतकृत्यतेचं समाधान देण्यासाठी बाहू फुरफुरत होते. पहाटेची वेळ असूनही, सगळे नियम ...
पुढे वाचा. : चुकामूक