माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
नवं वर्ष चालु झालं की अमेरिकेत "हॉलिडे" या कारणाखाली हॅलोवीनपासून मंदावलेलं जॉब मार्केट, प्रोजेक्ट्स सगळीकडे हालचाली सुरू होतात.थोडक्यात नवीन नोकरीच्या संधी येत्या सालात येणार असतील तर त्याचा सोन्याचा काळ सुरू व्हायला सुरूवात होते. आता मागच्या वर्षीचं रडगाणं सगळ्यांना माहित आहेच पण यावर्षी ते चांगलं होईल या आशेत सगळीकजण आहेत.आताशा पहिले आठ-दहा दिवस संपतात पण येईल येईल मुलाखतीची मेल/फ़ोन नक्की येईल...याच पार्श्वभुमीवर मला इतक्यात मेलवर आलेली ही मुलाखत अगदी मजेदार आहे..शक्यतो फ़ॉर्वड मेल्स ब्लॉगवर मी टाकत नाही पण ही वाचून राहावत नाही म्हणून ...