पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
पंढरीची वारी करणाऱया मंडळींमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुशिक्षित मंडळीही सहभागी होऊ लागली आहेत. यामध्ये तरुणांचाही सहभाग वाढला आहे. वारीचा एकदा तरी अनुभव घेण्याची माझीही इच्छा आहे. पाहू या कधी योग येतो तो. पंढरीच्या वारीप्रमाणेच हल्ली अनेक संस्था, मंडळे शिर्डी, शेगाव आदी ठिकाणीही पदयात्रा आयोजित करत असतात. त्याचेही प्रमाण वाढले असून या पदयात्रेतही मोठ्या प्रमाणात तरुण, सुशिक्षित मंडळी सहभागी होत आहेत.