जास्वंद ह्या शब्दाचा उच्चार ज्यास्वंद केलेला मी तरी ऐकलेला नाही... पाच वर्षांपूर्वीची ही चर्चा नुकतीच वाचनात आली म्हणून उशीरा प्रतिसाद पाठवीत आहे. या निमित्ताने ह्या चर्चेचे पुनरुज्जीवन होत असेल तर चांगलेच आहे.
संस्कृत जपाकुसुम पासून जास्वंद मराठीत आले असावे. संस्कृत ज चा मराठीत सर्वसाधारणपणे ज होतो. ज ज़हाज़ातला.
आता विषयाला सोडून थोडे वेगळे निरीक्षणः सध्या मनोगत ला प्रतिसाद कमी झाला आहे का? कोणत्याही वेळी ७-८ सदस्य आणि २०-२५ पाहुणे उपस्थित असतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे चर्चा रंगताना दिसत नाहीत....