योग्य तो उच्चार करणे बरोबर आहे. माहिती झाला तर तो करावा. पण माहित नसताना उच्चार चुकण्याच्या भीतीने बोलायचेच नाही असे व्हायला नको. जगभरातले लोक इंग्रजी शब्दांचे वेगवेगळे उच्चार करतात. त्यामुळे केवळ मराठी उच्चार चुकीचे आहेत असा ग्रह व्हायला नको.

आता माझे निरिक्षण, इंग्लंडातले लोक ऑचा उच्चार हिंदी औच्या जवळचा करतात. पण इतालियन, जर्मन आपल्या ऑसारखा. 
म्हणजे मला इंग्रजाने म्हटलेले वॉक जवळजवळ वोऽक सारखे ऐकू येते.  पण बऱ्यचशा युरोपियनांचे वॉक असे येते.