जास्वंदाची फुलं येथे हे वाचायला मिळाले:
अलिबागला जाताना मधेच खिंडीत उतरुन साधारण एक किमी चालत गेलं की टमटम (6 सीटर) स्टॅन्ड आहे.. तिथे अर्धा एक तास थांबलं दुपारच्या वेळेला की मग माणसं गोळा होतात एक टमटम भरण्यासाठी..पुण्यासारखं एका टमटममध्ये १०-१२ माणसं नाही भरत इथे.. ६-७ जमली की निघतात. वळणावळणांचा रस्ता.. पण सुंदर वगैरे नाही..रुक्ष ब-यापैकी! माझ्या डोक्यात अनेकदा रेडिओ वाजत असतो. ह्या प्रवासात स्वदेसचं थीम म्युझिक आहे ना, ते ऐकत होते. भारी वाटत होतं. मी काही खास करायला चालले नव्हते पण अचानक मोहन भार्गव सारखं भन्नाट वाटलं. गावाच्या नावाची पाटी दिसल्यावर मी उतरले . टमटमवाल्याने ...