चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
एखादी दुर्दैवी घटना दडवून ठेवण्यात चिनी अधिकार्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. प्रथम अशी कोणतीही घटना घडल्याचाच इन्कार करणे. ते अशक्यच झाले तर या घटनेमुळे झालेली जीवित किंवा मालमत्ता हानी कमीत कमी झाली असण्याचे सांगणे यात चिनी अधिकार्यांचा हातखंडा असतो. चार, पाच वर्षापूर्वी पूर्व एशिया मधे SARS या रोगाची मोठी साथ आली होती. चिनी आरोग्य अधिकार्यांनी कित्येक दिवस चीनमधे अशी काही साथ असल्याचेच नाकारले होते. जागतिक आरोग्य संघटनेला खरी परिस्थिती समजली तेंव्हा खूपच उशीर झाला होता व अनेक चिनी नागरिक ...