धन्यवाद भास्करदादा, आता बघता का जरा....
वर्षेचे उत्सव रिमझिमते
जलदांचे अवगुंठन चिंतन
समिर बावरा हलक्या करतो
आषाढी धारांच्या वेणा...
निळे सावळे घन थरथरते
दंव-बिंदूंचे हळवे स्पंदन
अन विहंग स्वर सुखे वाहती
शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा...
गीत अधरिचे हुळहुळणारे
थिजलेल्या मौनाचे मंथन
जीवन झरते होउन आतुर
झिणझिणते हृदयातिल वीणा...
मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे
रुजून झाली हिरवी पाती
शब्दांच्या सीमा लंघुनिया
कोरतात ओठांवर लेणी...
विशाल.