विरोध हिंदी भाषेला नसून हिंदी भाषकांच्या आक्रमकतेला आहे. मराठी स्थळनामे, बँका आदींच्या शाखांची नावे, रेल्वे स्थानकांची नावे या सर्वांच्या भ्रष्ट हिंदी आवृत्त्या सर्वत्र दिमाखात झळकत असताना पाहून तळपायाची आग मस्तकाला जाते.तलोज(तळोजा),पंडारे(पणदरे), पासन रोड(पाषाण रोड), कवाथे महंकल (कवठे महांकाळ), सत्पति (सातपाटी), मीरा रोड(मिरा रोड-इथे राजस्थानातल्या संत मीरेचा काहीच संबंध नाही. ). औंदा नागनाथ(औंढ्या नागनाथ) असा सर्व भ्रष्टाचार पाहून मन व्यथित होते.मला अशी माहिती कळली की कुठल्याही केंद्रीय आस्थापनाची शाखा कुठेही उघडताना तिथला पत्ता सरकारी पत्तेपुस्तकात (ऍड्ड्रेस बुक) छापला जातो व नंतर तोच अधिकृत बनतो. उदा. सर्व भारतीय राष्ट्रीयीकृत बँकांचे असे एक पत्तेपुस्तक रिझ्रर्व बँकेने छापलेले आहे. त्यात एकदा पत्ता छापून आला की तो चुकीचा असला तरी स्थानिक शाखा त्यात काहीच बदल करू शकत नाही. तो पत्ता राजपत्रित मानला जातो.शिखरस्थानी बसलेले लोक अहिंदी शब्दांविषयी काहीच आस्था दाखवीत नाहीत हे खरे आहे.
ता. क. मराठी स्थळनामांतला ळ हा आता लोप पावल्यातच जमा आहे तो हिंदीच्या अतिरिक्त प्रभावामुळेच. उदा. नेरुल, पिंपलगाव ऐरोली,नेरल, वगैरे.