अश्या प्रकारे खिचडी केली की एक दोन दिवस अगोदर करून ठेवता येईल आणि फ्रीज मध्ये १ ते ४ आठवडे साठवता येईल
नेहमी प्रमाणेच साबुदाणा ५ ते ६ तास धुवून भिजवून ठेवा. त्या नंतर त्या मध्ये मीठ, लाल तिखट , साखर , जिरा पावडर, घालून त्या वर जिर्या ची ठंड झालेली फोडणी घाला --ढवला --मग दाण्याचे कुट घाला --ढवळा- हे कच्चे मिश्रण डब्यात भरून ठेवा --फ्रीज मधे ठेवा --फ्रीज नसेल तर १-२ दिवस टिकेल --फ्रीज मधे ४ आठवडे --डीप फ्रीज मध्ये कितीही ---पुन्हा वापरत आणताना--पाण्या चा स्प्रे मारा आणि थोडे तूप अगर तेल घाला आणि वाफे वर गरम करा मायक्रो असेल तर १ ते २ मी हाय वर गरम करा मधे एकदा ढवळून---जास्त प्रमाणात खिचडी करताना हीच पध्हत वपरता येइल--आणी जशी मागणी येइल तशी ताजी खिचडी देता येइल