बेधुंद येथे हे वाचायला मिळाले:
माणसाचा चेहरा बरयाच वेळेला खुप काही सांगून जातो. कोण म्हणतं की संवाद फक्त बोलूनचं साधता येतो. बोलके डोळे, बोलका चेहरा एवढंच काय स्पर्श ही सारी संवादाचीच तर माध्यमं आहेत. ज्या गोष्टी शब्दांद्वारे पुढच्याला सांगता येत नाहीत त्या चेहरयावाटे कुठेतरी बोलून जातात. चेहरयावरची एखादी सू़क्ष्म छ्टासुद्धा एखाद्याच्या मनातला काय चाललाय हे सांगते. संवाद साधणं ही एक कला आहे असं लोक म्हणतात, मी मात्र याच्याकडे एक अनुभव म्हणूनच पाहतो. आयुष्यभर घेतच रहावा असा अनुभव. प्रभावी संवाद साधणं याला मी कला म्हणेन. नुसतंच भारमभार बोलणं म्हणजे संवाद ...