अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
गेले काही दिवस वर्तमानपत्रांतून सतत लहान मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. मनाला अतिशय क्लेशदायक अशा या बातम्यांमागे मुख्य सूत्र आहे ते या मुलांच्या मनावर आलेल्या अभ्यासाच्या दडपणाचे. ज्या वयात मनसोक्त खेळायचे आणि मजा करायची त्या वयात ही मुले अभ्यासाच्या, परिक्षेतील यश-अपयशाच्या, तणावाखाली अक्षरश: दबून,चिरडून गेलेली आहेत.
तसे बघायला गेले तर आता परिक्षा पद्धती कितीतरी सुलभ झालेली आहे. चौथी, पाचवी पर्यंत तर अनेक शाळांच्यात परिक्षाच नसतात. पूर्वीपेक्षा अभ्यासक्रमही सर्वसाधारण मुलांना समजेल उमजेल असेच बनवले जात आहेत. तसेच ...
पुढे वाचा. : मुलांना सर्वात जास्त आवडणारे बक्षिस