पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
आमीर खानची प्रमुख भूमिका असलेल्या थ्री इडियट्स हा चित्रपट सध्या चर्चेत आणि वदाता सापडला आहे. मुंबई आणि परिसरात सध्या विद्यार्थ्यांच्या ज्या आत्महत्या घडत आहेत, त्यास हा चित्रपट कारणीभूत असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. चित्रपटात रॅगींग दाखविण्यात आलेले रॅगिंग, चित्रपटात एका विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या आणि अन्य काही बाबी या खटकणाऱया असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. हा चित्रपट मी ही पाहिला. परंतु चित्रपटात कुठेही रॅगींगचे उदात्तीकरण करण्यात आलेले नाही. तसेच चित्रपटापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आत्महत्या कराव्यात, असे या चित्रपटात ...