नावाचं एक पुस्तक आहे, त्यातली जी शाळा आहे, ती वैयक्तिक मला खूपच आवडली.
असं ऐकलं आहे, की पुण्यातील काही शाळांमध्ये, एका विशिष्ट वयोगटाच्या मुलांसाठी 'मार्क' सिस्टिम न ठेवता, तोत्तो च्यान च्या शाळेसारखेच काही प्रयोग केले आहेत. (शाळेचं नांव माहित नाही  )

वास्तविक, वरील परिस्थितीत, (मार्कांची सिस्टिम असणाऱ्या शाळेतही), शिक्षिकेने, केवळ त्या मुलीची चूक तिला चांगल्या रीतीने पटवून दिली असती, आणि सगळ्यांच्याइतकेच मार्क दिले असते तरीही चालले असते. त्यांनी कमी करताना 'पाव' मार्कच जरी कमी केला असला, तरीही त्याचा त्या लहानगीच्या मनावर झालेला परिणाम कमी नव्हता. (त्या शिक्षिकेने स्वतःच्या मुलीला त्या मुलीच्या जागी ठेवून बघावे. )
भास्करराव म्हणतात तसे- तुम्ही तिच्यावर कसलेही दोषारोप केले नाहीत, तू असे का लिहिलेस वगैरे पंचनामा केला नाहीत हे तुमचे कौतुक आहे.