'वदतोव्याघात' बरोबर असावे. मनोगत प्रशासनाने जरी 'वदतो व्याघात' लिहावे असे इथे म्हटले असले तरी हा मूळ संस्कृत शब्द जालावरील शब्दकोशांत 'वदतोव्याघात' ह्या रूपात सापडतो. दुवा १, दुवा २. मोल्सवर्थनुसार ह्याचा अर्थ एखादी अशक्य किंवा अत्यंत कठीण गोष्ट अस्तित्वात आहे असे म्हणणे असा असला ("... असर्टिंग ऍन इंपॉसिबिलिटी ऑर अ डिफिकल्टी टू बी फॅक्ट. ") तरी इतर बहुतेक शब्दकोशात विरुद्धार्थी शब्दप्रयोग ("कॉंट्रॅडिक्शन इन टर्म्स") हाच अर्थ सापडतो.