बिंबिसार म्हणजे काय कोण जाणे? त्या नावावरून मारुतीच्या नाभीतल्या विंचवाने डंख मारल्यानंतरसुद्धा बेंबीत बोट सारल्याने गारगार वाटते असे सांगणाऱ्याची गोष्ट आठवेल. बिंदुमाधव हे नाव (१) वैद्य विद्याताई जळूकरांच्या वडिलांचे म्हणजे भिषग्‍रत्‍न बिंदुमाधवशास्त्री पंडितांचे आणि (२) ग्राहक पंचायतींच्या बिंदुमाधव जोशींचे. म्हणजे तसे जुनेच. बिंदुसार मात्र अगदी अपूर्व नसले तरी असाधारण नाव आहे. आत्तापर्यंतच्या नावांत नावीन्यपूर्ण!