संदिग्ध अर्थाचे उखाणे येथे हे वाचायला मिळाले:
सहा महीने-वर्षं गेलं म्हणजे साळगावकरांच्या कालनिर्णयची नुस्ती पान फरफरा नाही उलटली. सॅन्डीचे ३, पॅडीचे २ आणि ढापण्या रम्याचे ० बॅकलॉग राहीले. पॅडीची सिगरेटची नावड कायम राहीली तरी मीरेला तो खमंग वास भारी भावला. मोराच्या टोकाला काडी लावून धुक्यातून तारयाकडे तिचा प्रवास सुकर सुरु झाला. मोर म्हणजे राष्ट्रीय पक्षी नाही काही, नवशिक्यांसाठीची हल्की आगीनकाडी!- धुरांच्या रेषा हवेत झाडी!! सॅन्डीला एकटं वाटू नये म्हणून पॅडीनं आणि चकणा नुस्ता खाताना अपराधी वाटू नये म्हणून रम्यानं दारु प्यायची सवय जडवुन घेतली. एनपी आणि डोलीच्या चार दंड-बेटकुळ्या ...