युवराज बरोबर निसर्ग निरीक्षण येथे हे वाचायला मिळाले:

मखमली मून मॉथ.
जगातल्या सर्व देखण्या पतंगांची यादी केली तर त्यात आपल्या भारतातल्या मून मॉथ याचा नंबर नक्कीच वराच वरती येईल. दिसायला अतिशय सुंदर असणारा हा पतंग भलामोठा म्हणजे अगदी ५ इंचांएवढा असतो. अतिशय तलम, मखमली पिस्ता रंगाचे हिरवट असे यांचे पंख असतात. त्या पंखांची वरची कडा गडद किरमीजी रंगाची असते तर खालच्या पंखांची टोके एखाद्या शेपटीसारखी लांब आणि वळलेली असतात. पंखांच्या मधे एक पारदर्शक खीडकीसारखे गोलाकार छिद्र भासते. ही नक्षी चंद्राच्या कलेसारखी दिसते म्हणूनच हा "मून" मॉथ. यांचे शरीर जाडजूड, केसाळ आणि पांढरेशुभ्र ...
पुढे वाचा. : *मखमली मून मॉथ.*जगातल्या सर्व देखण्या पतंगांची यादी केली तर