ह्या दुकानावर बहिष्कार घातला पाहिजे. धंदाच चालला नाही, तर दुकान बंद करावंच लागेल त्यांना.
त्या एम. डी. ने माफी मागताना 'टीझर' असा स्पष्ट उल्लेख केला आहे. म्हणजे हे चुकून झालेलं नाही हे नक्की.
जाणून बुजून असले प्रक्षोभक शब्द्द वापरायचे आणि वर म्हणायचं, की आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं हो (म्हणजे वाचणाऱ्यानंच स्वतःचं इंटरप्रिटेशन सुधारावं), ह्याला काही अर्थ नाही.
पण बहिष्कार घालणं खरंच शक्य होईल?
कारण आपण सगळेच ह्या परदेशी खाद्य-पदार्थांच्या ब्रँडस चे इतके अधीन झालो आहोत, की मला तरी असा बहिष्कार घातला जाणं अवघड वाटतंय.