नमस्कार!
मूळ लेखाच्या पहिल्याच वाक्यात "हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा (कागदोपत्री)" असा दावा केला आहे.
खरी गोष्ट अशी आहे की सांगोवांगी जरी आपण हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा असे म्हणत असलो, तरी प्रत्यक्ष कागदोपत्री मात्र तसे कुठेही दिसत नाही, ना सिद्ध करता येते!
त्यामुळे या दाव्याचे खंडन करणे आवश्यक आहेच आहे.

हिंदी ही राष्ट्रभाषा का नसावी, याविषयी अन्य समांतर चर्चेत ("हिंदी नको, इंग्रजी हवी") भरपूर मुद्दे मांडण्यात आले आहेत (उदा. जागतिक भाषा, प्रगतीची भाषा, बऱ्याच प्रांतांना हिंदीपेक्षाही अधिक जवळची/परिचयाची वाटणारी भाषा, बऱ्याच प्रांतांना त्यांच्या आपापल्या राज्यभाषांसाठी आणि भाषावैविध्यासाठी हिंदीपेक्षा कमी धोक्याची वाटणारी भाषा, कुणा एका भाषक/प्रांतिक समूहाला अनुचित फायदा मिळू न देणारी भाषा, इंग्रजीचे मुळचे संवैधानिक स्थान, राज्यकारभार/उद्योग/व्यापार/उच्च शिक्षण/न्याय यांची सध्याची भाषा, ज्ञानभाषा इ. इ.).
इतकेच नव्हे, तर हिंदी हीच राष्ट्रभाषा का असावी याच्या समर्थनार्थ जे मुद्दे सामान्यतः मांडले जातात (बहुसंख्यांची भाषा, भारताची 'आपली' भाषा, बहुसंख्यांना अवगत भाषा, बहुसंख्यांना कळणारी भाषा इ. इ. ), त्यांची व्यर्थता स्पष्ट केली आहे. तसेच हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा भ्रम पसरवण्यामुळे अन्य भारतीय भाषांना व भाषिकांना तोटे कसे होत आहेत हेही मांडले आहे.

मराठा