स्क्रिब्डी.कॉम  या संकेतस्थळावर कोणीही कोणतेही पुस्तक संग्रहीत करायची सोय केलेली आहे. त्याचा फायदा घेऊन मी एक छोटेखानी  ग्रंथसंग्रह जोडला आहे. मी संगहीत केलेली  बहुतेक पुस्तके धार्मिक स्वरूपाची आहेत.   - साईट उघडल्यावर वरील उजव्या कोपर्‍यात  'Documents' असे एक बटण दिसेल, त्यावर टिचकी मारल्यास संपूर्ण संग्रह पाहता येईल. त्याच संकेतस्थळावर 'ग्रूपस्' ची सोय आहे. अशा ग्रूपवर इतर सभासदांनी  उधृत केलेली पुस्तकेही संग्रहीत करता येतात. तथापि मी एक 'मराठी-मंडळ' नावे ग्रूप बनविला आहे. तेथेही अनेक सभासदांनी इतर पुस्तकेही जोडली आहेत.
   सूचना  :   पुस्तकांचा आकार साधारण १० ते ३० MB असल्यामुळे डाऊनलोड करायची असल्यास हायस्पीड जोडणी नसेल तर कदाचित् फार वेळ लागू शकतो. 
विश्वास भिडे -