अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:


अलीकडे शाळेत जाणार्‍या सर्व मुलांच्या गळ्यात किंवा हातात पाण्याची बाटली ही असतेच असते. बाहेरचे कोणतेतरी अस्वच्छ पाणी आपल्या मुलामुलींनी न पिता घरचे उकळलेले किंवा फिल्टरमधून काढलेले निर्जंतुक पाणी प्यावे हाच पालकांचा यामागचा उद्देश असतो आणि तो स्तुत्य आहे यात शंकाच नाही. मी शाळेत असताना आमच्या शाळेत एक पाण्याचा हौद असे. त्याला आठ दहा तोट्या लावलेल्या असत. कॉर्पोरेशनचे पाणी टाकीत पडत असे. ते पाणी तोटीला तोंड लावून प्यावे लागे. आजूबाजूचा भाग नेहमी ओला रहात असल्याने फरशांच्यावर शेवाळे साठे व त्या हिरव्यागार दिसत. पण आश्चर्याची गोष्ट ...
पुढे वाचा. : बाटलीतला राक्षस