लेख नेहमीप्रमाणेच छान आहे. ही शिक्षण पद्धती बदलायला हवी आहे हे तर निश्चित. पण हे काम एकट्या दुकट्याचे नाही. आपले राज्यकर्ते गेंड्याच्या कातडीचे आहेत. काहीतरी अणकुचीदार चीज हवी त्यांना जागे करायला. या मुलांच्या आत्महत्या तरी त्यांना जागे करतील की नाही कोण जाणे? पण तुम्ही दोघांनी मात्र ती गोष्ट लाईटली घेतलीत या बद्दल तुमचे उभयतांचे मनापासून अभिनंदन. तुमच्या छकुलीला तुमच्या या अशा मानसिक आधाराचीच गरज पुढेही पडणार आहे. अशा वेळी तिला असेच सांगा की ठीक आहे  यावेळी आपल्याला माहित नव्हते म्हणून चूक झाली. पुढच्या वेळी लक्षात ठेवून बरोबर लिही.