आहे. शिकवायची कला वा आवड नसतांना शिक्षकी पेशा पोट भरण्यासाठीं तिनें स्वीकारलेला दिसतो आहे. पूर्वप्राथमिक यत्तेला शिकवणाऱ्या शिक्षिकेकडून फारशी अपेक्षा नसावीच. पुढील शिक्षक शिक्षिका चांगला/चांगली असेल अशी आशा करूं या. पण प्राप्त परिस्थिती बदलायचा प्रयत्न केल्यास त्रासच होण्याची शक्यता आहे. तेवढा लढा द्यायची शक्ती असल्यासच लढा द्यावा.
तरी छोटीला आईबाबांच्या पाठबळाची जरूर आहे. तें असल्यास तिला या गोष्टींची संवय होईल. तिला आधार देण्याचा आपला पवित्रा अगदीं योग्य. त्याबद्दल अभिनंदन. अगदीं फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हल बनवा.
सुधीर कांदळकर