प्रीतीताई म्हणतात ते बरोबर. साधी गोड कथा. त्यामुळे तसाच हलका फुलका शेवट झाला.

पण एक क्ल्पना मनात आली. असा शेवट कसा वाटला असता?

पण तू काळजी करू नकोस. एक नक्की की तुझी सहनशक्ती जबरदस्त आहे. या अशा माणसांबरोबर इतकी वर्ष काढूनही तू इतका संयम कसा काय ठेवू शकतेस हे काही समजत नाही.

यावर सारिका मोठ्या गांभीर्याने म्हणाली, "अरे बाळ, ध्यानधारणेने असा मनावर संयम आणणे सहज शक्य होते. तूही करून पाहा!!"

क्षणभरच विशालने चक्रावून तिच्याकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी दोघे हास्याच्या धबधब्यात न्हाऊन निघाले. हसता हसता विशालने सारिकाचा हात कधी हातात घेतला हे दोघानाही कळलं नाही.   

कसा वाटतो सांगा.