मला चित्रपट आवडला. पैसे वाया जातील म्हणून बघणार नव्हते; काही कारणाने बघणे भाग पडले. ते बरेच झाले असे वाटले.
मुळातच हिंदी चित्रपट बघायला जात आहोत हे लक्षात ठेवून अपेक्षांचा काटा योग्य जागी ठेवून गेल्याचा परिणाम म्हणून मला भरपूर मजा आली असावी.
नायिकेने लग्नात पळून जाणे, नायकाने कायम पहिले येणे वगैरे गोष्टी मला अपेक्षित होत्या. त्यामुळे विशेष वाटले नाही.
चित्रपटाचा संदेश, जो सगळ्यांना पटला - की तरुणांनी आपल्याला हवे ते करा - पालकांनी दबाव आणू नका - वगैरे, तेच मुळात पटले नाहीत.
पालक काही एकजात दबाव आणणारे नसतात. शिवाय, ते उगीच मजा म्हणून काही सांगत नसतात. शेवटी फरहान आपल्या वडिलांना पटवतो तो प्रसंग मला सगळ्यात जास्त आवडला. तसा संवाद असेल, तर कोणतेच पालक आतताईपणा करणार नाहीत असे मला वाटते.
ज्ञान मिळवणे आवश्यक, पदवी नाही. हा संदेश मात्र पटला.
एकंदरित एक मनोरंजनप्रधान चित्रपट म्हणून थ्री इडियटस आवडला.
प्राचार्यांचा हा विनोदी खलावतार