....(जांबुवंतराव धोट्यांनी) रामराव आदिकांची कन्या ऍड. विजया आदिक यांच्याशी केलेला विवाह जगावेगळा. "माझा विवाह आकाशाच्या मांडवाखाली, सागराच्या साक्षीने झाला आहे. मला वैदिक विवाहपद्धती मान्य नाही", असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. पण गंमत अशी की, धोटे यांच्या क्रांती या कन्येचा विवाह झाला तेव्हा डॉ. श्रीकांत जिचकार यांनी पौरोहित्य करून वैदिक पद्धतीने धोटेंच्याच पुढाकाराने विवाह लावून दिला होता.....