चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:

"चार दिवस सासूचे" अशी एक म्हण आपल्याकडे आहे. मात्र सध्याच्या चिनी कुटुंबांत घरातला बच्चा किंवा बच्ची यांना जे VIP स्थान प्राप्त झाले आहे त्यावरून हीच म्हण या चिनी कुटुंबांसाठी तरी "चार दिवस छोट्यांचे" अशीच बदलली आहे असे म्हणावे लागते. फेंग ची (काल्पनिक नाव) हा बिजिंगमधल्या एका सधन कुटुंबातला तीन वर्षाचा एकुलता एक मुलगा आहे. घरात आई-वडील, आजी आजोबा आहेत व दुसरे आजी-आजोबा जवळच रहात आहेत. या सगळ्या नातेवाईकांत हा एकटाच छोटा मुलगा आहे. साहजिकच फेंग ची चे कमालीचे लाड होत असतात. गोळ्या, चॉकलेट, नवे कपडे आणि खेळणी, काय पाहिजे ते त्याला ...
पुढे वाचा. : छोटे बादशहा