मला पूर्वी भेळ आवडायची; पण पुण्यात काही वर्ष काढली तेव्हा मिसळ खायची सवय लागली आणि भेळ आवडेनाशी झाली!
हे मुद्द्याला सोडून झालं.
हे खरं तर 'घर की मुर्गी' सारखं आहे असं मला वाटतं.
चवीच्या बाबतीत म्हणायचं तर मला घरची भेळ (किंवा मिसळ त्यापेक्षा) आणि बाहेरचीही आवडते.
जेव्हा भेळ (विशेषतः मुंबईत) किंवा दुसरा कुठलाही न शिजवलेला/थंड पदार्थ खायचा प्रसंग येतो तेव्हा मी तरी आपल्या पचन आणि प्रतिकार शक्तीवर भरवसा ठेवूनच खातो.
- कुमार