मी शोधतो किनारा... येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या वर्षीच्या ख्रिसमसची गोष्ट. आमच्या क्लायंटच्या ऑफीसमध्ये खिसमसच्या दिवसांमध्ये "पॉटलक" साजरा केला जातो. हा पॉटलक म्हणजे आपल्या कृष्णाच्या गोपालकाल्याचं अमेरिकन रुप. प्रत्येकाने आपापल्या घरून शिदोरी आणायची आणि सगळ्यांनी मिळून खायची. तसाच काहिसा हा पॉटलक असतो. आमचे अमेरिकन सहाध्यायी तसेच घरदार वाल्या आमच्या भारतीय सहकार्यांनी आपापल्या घरून काही न काही बनवून आणलं होतं. अगदी आमच्यातल्याच हौशी "बॅचलर" स्वयंपाक्यांनीही चांगलं चुंगलं बनवून आणलं होतं. परंतू माझ्यासारखे जे आळशी नमूने होते त्यांनी बिलकूल तसदी न घेता शहाजोगपणे जवळच्याच एका ...