वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
डोळ्यासमोरची ट्रेन चुकली आज. असला वैताग आला.. आता पुढच्या ट्रेन साठी थांबा. म्हणजे पाचच मिनिट. पण आपल्याला काय वैतागायला काही कारण चालतं. पण त्या पाच मिनिटांचा मी नेहमीप्रमाणे सदुपयोग केला. विचार करण्यासाठी. म्हणजे आता मी दोन ट्रेन च्या मधल्या वेळातच विचार करतो (आणि एखाद्या दिवशी ट्रेन साठी थांबावं लागलं नाही तर विचार नाही?) हे असले अभद्र विचार (तुम्ही माझ्यासारखे दोन ट्रेनच्या वेळेच्या मध्येच विचार करता असं मी गृहीत धरत नाहीये. तेव्हा तुम्हीही धरू नका.) मनात आले असतील तर ते ताबडतोब झटकून टाका. आणि आले नसतीलच तर मग.. तर मग.. वरची ओळ वाचलीच ...