रांचो ही काही व्यक्तीरेखा नाही ती तुमच्या-माझ्यातली उन्मुक्त जगण्याची उर्मी आहे. ही उर्मी अनेक प्रकारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करते.
स्वानंद किरकिरेचे शब्द बघा:
'बहेती हवासा था वो,
उडती पतंगसा था वो,
कहाँ गया उसे ढूंढो
हमको कल की फ़िक्र सताती,
वो बस आजका जश्न मनाता,
हर लमहे को खुलके जीता था वो,
कहाँसे आया था वो,
छुके हमारे दिलको,
कहाँ गया उसे ढूंढो
हे गाणं ऐकल्यावर माझा मित्र म्हणाला अरे अश्याच अर्थाचं संदीप खरे नी काहीतरी लिहीलयं. संदीप म्हणतोः
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो
अमीर तुमच्या उर्मीला साद देण्याचा प्रयत्न करतोय, स्वानंदनी मस्त गाणी लिहीलीयेत, शांतनुनी सुरेख म्युझीक केलयं, राजकुमार हिरनानी नी अत्यंत खेळकर पद्धतीनं तो विषय मांडलाय, सर्वानी एकसेएक कामं केलीत, तुम्ही अनावश्यक डिटेल्समध्ये शिरताय त्यामुळे तुम्हाला तो अप्रिशीयेट होत नाहीये. असो जगण्याचा प्रत्येकाचा आपला-आपला अंदाज आहे!
संजय