मला तरी चित्रपट आवडला. कोणताही प्रसंग ओढून ताणून आणलाय असे वाटत नाही. मुख्य म्हणजे रॅगिंगला तोंड कसे द्यायचे आणि आत्महत्या न करता मार्ग कसा काढायचा हा संदेश यातून प्रभावीपणे दिला जातो आहे. ज्याची आजच्या मुलांना आणि त्यांच्या  अति दक्ष(? ) पालकांना गरज आहे. याच "गद्य लेखन" मध्ये प्रसिद्ध झालेला "पाव मार्काचा धडा" हा लेख वाचा. सत्य समोर येईल. एकतर आपण दोन-अडीच वर्षांची मुले शाळेत घालतो. या लेखकाच्या ४ वर्षांच्या मुलीला तिचा पाव मार्क कापला गेल्याने जे दुःख झाले ते बघता जी मुले तीन-चार विषयात नापास झाली आहेत त्यांच्यावर किती जबरदस्त ताण असेल याचा अंदाज सहज येतो. या मार्कांच्या स्पर्धेत आपण मुलांच्या बाल्याची होळी करतो आहोत असे नाही वाटत? ती शिक्षिका त्या मुलीला तिची चूक दाखवून हे सांगू शकत होती की आता तुला पूर्ण मार्क्स दिले आहेत पण ही चूक सुधार. किंवा हे तिच्या पालकांनाही सांगता आले असते. त्यासाठी तिचा पाव मार्क कापायची काहीच गरज नव्हती. जेव्हा तुम्ही शिक्षकाचा व्यवसाय निवडता तेव्हा तुम्हाला बी. एड. करावे लागते. त्यात बाल मानसशास्त्र हा विषय असतोच. ही शिक्षिका तोच नेमका शिकली नसावी.