जन्मभर शोधुनी भेटली तर म्हणे
पाहिल्यासारखा वाटतो चेहरा

मी स्वतःला दिले एवढे चेहरे
चेहराही अता मागतो चेहरा

रात्रभर जोडतो भग्न अवशेष अन
मी सकाळी पुन्हा लावतो चेहरा

  - छान, विशेषतः शेवटची द्विपदी.