तुमचा बघण्याचा दृष्टीकोन सगळं ठरवतो!
सहमत. अर्थात मला चित्रपट आवडला. त्यातील काही प्रसंग उगाच टाकलेले किंवा अतिशयोक्ती केलेले वाटले तरी तेवढा भाग वगळून सिनेमा चांगला वाटला. सर्वच आपल्याला आवडेल असे नाही.
बाळाने लाथ मारण्याचा प्रसंग जास्तच वाटला. पण मी ऐकल्याप्रमाणे वॅक्युम क्लीनरने बाळंतपण केल्याचा प्रसंग हा त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून घेतला आहे. तो अतिशयोक्ती वाटला व अपेक्षित नसला तरी चुकीचा नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका चोरणाऱ्या मुलांना प्राचार्यांच्या मुलीचे यशस्वी बाळंतपण केल्याबद्दल रस्टिकेशन ची शिक्षा माफ होऊन शिवाय ते गाजलेले पेन बक्षीस मिळते हे बघितल्यावर पेपर फोडा आणि सरांच्या 'गुड बुक्स' मध्ये स्थान मिळेल असे बघा म्हणजे शिक्षा माफ होते असा जर कोणी निष्कर्ष काढला तर त्यात काय चुकले?
माझ्यामते रस्टिकेशन ची शिक्षा माफ करण्याच्या मागील उद्देश फक्त बाळंतपण केले हा नसून त्याआधी करीना कपूरने दिलेले एक कारण आणि पत्रही असेल. किंवा फक्त त्याच कारणामुळे शिक्षा माफ केली असेल आणि नायकाला 'ते' पेन देण्याकरीता हा डीलीवरीचा प्रसंग टाकला असेल.