विषय गंभीर आहे. शिक्षणपद्धती बदलणे हा उपाय असू शकेल कदचित. पण एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे हा बदल घडवणार कोण? ही जबाबदारी फक्त राज्यकर्त्यांची आहे असं मला वाटत नाही. कुठलीही सद्यस्थिती ही सर्वसामान्य लोकानी संघटीत होऊन, आपला बहुमूल्य वेळ केवळ अपेक्षित बदलासाठी खर्ची घातल्याशिवाय बदलू शकत नाही. प्रगत देशांचा इतिहास देखील हेच सांगतो. राज्यकर्ते काहीच करीत नाहीत हे जरी खरं असलं तरी इतक्या मोठ्या देशात राज्यकर्ते सोडून उरलेले सर्वसामान्य लोक सद्यस्थिती आवडो वा ना आवडो पण तिचा स्वीकार करतातच हे देखील कटु सत्य आहे. गेली कित्येक वर्ष आपण शिक्षणपद्धती बदलावी म्हणून चालत असलेला आरडाओरडा ऐकतो आहोत. पण कसंतरी एकदा पदवीपर्यंत आवडत नसलेल्या पद्धतीनी शिक्षण घेऊन येन केन प्रकारेण देश सोडून उच्चशिक्षणासाठी बाहेर जाणं आणि तिथेच कायमचं वास्तव्य करून पुन्हा आपल्या देशातल्या शिक्षणपद्धतीला आणि राज्यकर्त्याना दोष देणं हाच पर्याय बहुतांशी लोक स्विकारत असल्याचं दिसतं.
तुम्ही तुमच्या मुलिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात ही सगळ्यात महत्त्वाची, आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आणि तुमच्या मुलीला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
पण पुन्हा प्रश्न तसाच आहे. सुरुवात कोण करणार?