हात हाती घेतल्यावर
सोडायचा नाही
असा कोणताही नियम
मी वाचलेला नाही

वळणावळणावर साद येते
पुढे पुढे जाण्याची
वळणावळणाला इच्छा होते
मागे वळून पाहण्याची

आयुष्याचा दोर
तुझ्या हाती दिला
तेंव्हाच नशिबाने
हात त्याचा काढला