उपक्रमाची मशारनिल्हे माहिती अतिशय वाचनीय आहे. आपल्या आजूबाजूला असे काही चांगले चालते हे वाचून बरे वाटले.
तरीपण एक शाळकरी साळसूद शंका! हे श्री श्री काय प्रकरण आहे? त्यातला एक 'श्री' नावाचा भाग असता तर तो नावाला चिकटला गेला असता व पहिल्या श्रीनंतर टिंब आले असते.. उदा. श्री. श्रीकृष्ण हवालदार. तर हा काय प्रकार असावा? की 'श्री श्री' ही टिंबे न दिलेली नावांची आद्याक्षरे आहेत?
वरील लेख टंकलिखित होत असताना शुद्धलेखन स्वयंसुधारक बहुतेक झोपला असावा. नाहीतर एवढे मुद्रणदोष कसे झाले असते?
दोष असेः
पध्दतीने(दोनदा), सामुहिक(दोनदा), शुध्द,सर्वोत्कृष्ठ, स्वयंसेवकाचे ही, शिबीर, सुरु. हे शब्द अनुक्रमे पद्धतीने, सामूहिक, शुद्ध, सर्वोत्कृष्ट, स्वयंसेवकाचेही, शिबिर, सुरू असे आपोआप दुरुस्त व्हायला हवे होते. आणि तोडीला की तो/जोडीने? चतुर्थीपेक्षा तृतीया अधिक योग्य वाटत नाही? मला वाटते, तोडीला येणे आणि तोडीने किंवा जोडीने वाढणे हे वापर उचित असावेत. . मतभिन्नता/वादविवाद अपेक्षित आहेत.