चिमणचं चर्हाट येथे हे वाचायला मिळाले:
ऑक्सफर्डच्या हिस्टरी ऑफ सायन्स म्युझियम मधे अॅस्ट्रोलेब (Astrolabe) या एका जुन्या बहुपयोगी उपकरणाबद्दलची माहिती ऐकण्याचा योग नुकताच आला. ते यंत्र पूर्वी त्या म्युझियममधे पाहिलेलं होतं पण त्याचा वापर तेव्हा कसा करायचे ते समजलं नव्हतं. त्यामुळे ते भाषण ऐकायला उत्सुकतेने गेलो.