तांबडं फुटतंय... येथे हे वाचायला मिळाले:

ताड ताड फुटाणे फोडत चुल जळत होती. माझी नजर गेल्या तासाभरापासून जाळावर स्थिरावलेली. बुबुळं जिव्हाळणाऱ्या आगीच्या तालावर नाचत होती. कानात भाकरी थापण्याचा थप थप थप थप आवाज घुमत होता. मी मान वर केली. माय चुलीशेजारच्या वट्यावर दोन्ही पायाच्या अंगठ्यात काठवट धरुन भाकरी थापत होती. पिठाळलेल्या हातानं बांगड्या मागं सारत ती काठवटीतल्या पिठात पाणी टाकायची. मळून मळून भाकरीच्या मापाचा गोळा करायची. लईच झाला तर तेवढा कमी करुन काठवटीच्या कानाला लावून ठेवायची. पुढच्या गोठ्यात घेण्यासाठी. मग गोळ्याखाली कोरडं पिठं ...
पुढे वाचा. : पांढरी