आपला लेख चांगला आहे.
सध्या सगळीकडे, सर्व स्तरांतून 'बोअर' झाल्याची रड ऐकू येते. उठता-बसता, खाता-पिता लोक 'बोअर' होत असतात.
त्यांना कंटाळ्याने घेरलेले असते. कंटाळ्यावर पण उपाय आहेत. अतिशय व्यवहारी उपाय म्हणजे अन्य कोणत्या तरी गोष्टीत मन गुंतवा.
दिनचर्येत फरक करा. आहारात सुधारणा करा. झोप पूर्ण होते ना ह्याकडे लक्ष द्या. इतरांच्या उपयोगी पडा. लोकांना मदत करा. प्रेरणादायी पुस्तके वाचा. निसर्गाच्या सान्निध्यात राहा. आणि तरीही कंटाळ्याचा निचरा नाही झाला तर स्वतःला एक टपली मारा व कामाला लागा! :-)