मराठी साठी जे जे कोणी करतंय! ते ते तिच्या साठी पुरे आहे असे मला वाटते. कारण मराठीचा वाद तसा जुनाच आहे तो नव्याने पुन्हा उपस्थित
झाला नाहीतर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हे वाक्य उद्गारणारे विसरले पण मराठी वाचक विसरला नसेल . असो हा वादाचा मुद्दा आहे,
आपली वादासाठी निरपेक्ष माघार!
मराठीच वैभव निश्चितच तिला प्राप्त होईल! फक्त तिची मूल कर्तृत्वाने तेजाळू दे! त्यांना त्यांच्या मराठीजनांचा विसर न पडो!, त्यांना त्यांच्या इतिहासातील स्वाभिमान कायम दृष्टिगोचर होत राहो. मराठा म्हणून प्लासीच्या लढाईत हुतात्मा झालेल्या आपल्या एका संपूर्ण पिढीच कायम
स्मरण होत राहो!,महाराष्ट्र इतिहासातील चुकांकडून खूप काही चांगलं शिको!,. मराठीला राजाश्रय प्राप्त होवो!.
ह्या जर गोष्टी आमच्या स्मरणात राहिल्या , आणि त्याचे दैनंदिन चिंतन आंम्हाकडून होऊन आंम्हाला आमचे बल स्थान जर ऊमगु लागले तर!,
तर!, निश्चितच मी मराठी साठी काय करतो ? हे निश्चितच एकमेकांना विश्लेषित करावे लागणार नाही आणि मग आमच्या माय मराठीला
आपल्या मुलांना सुगीचे दिवस दाखवण्यासाठी कोण थांबवू शकेल ?