काही वेळा तुम्हाला असे अनेक श्री एकापुढे एक ओळीने लिहिलेले दिसतील.
ही
माहिती मला नवीन आहे. आजच प्रा. डॉ. प्र̮. ल.गावडेंना ही शंका मी विचारली होती, त्यांनी जवळजवळ असेच उत्तर दिले. याअगोदर मला
नावापूर्वी '१०८ श्री'(अंकी १०८, १०८ वेळा नाही! )लावून घेणारे बुवा माहीत होते, पण श्रीयावळधारी गुरू नव्हते.
ह. भ. प. ही वारकरी संप्रदायाच्या मुख्यालयाने दिलेली पदवी आहे. पूर्वी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच हभप होते, आता निदान शंभरसवाशे असतील.
'श्री श्री'ची तुलना 'एच् एच्'शी केलीत हे आवडले. फरक एवढाच की आपला श्री मंगलार्थी आहे, उपाधीपुरता नाही.