१. भेळेसारखा पदार्थ खावासा वाटण्यास आजूबाजूचे वातावरण पोषक ठरते. भेळेचा वास, संध्याकाळ, गर्दी. (बाग असली तर बाग). इतर काही 'आजूबाजूला असावेत असे चालतेबोलते घटक' आपण घेऊन फिरत असलात तर आणखीनच मजा यावी, पण तो आपला प्रश्न!
२. तो माणूस कोणताही विधिनिषेध न बाळगता हातानेही काही पदार्थ टाकतो. यात 'मनापासून करण्याची इच्छा' नावाचा एक अदृश्य व अविश्वसनीय पण 'नंतर पटू शकेल' असा घटक अस्तित्वात येतो. हा घटक घरी बायकोने चमच्याने नाजूकपणे टाकलेल्या चिंचेच्या पाण्यात नसतो.
३.   भय्याची 'चव' या बाबतीत अति सरावाने आलेली हुकुमत असते.
४. भय्या भेळ करतो तेव्हा भेळेत चांगले लागू शकतील असे सर्वच्या सर्व पदार्थ तो बाळगतो. घरी माणूस तसे करेलच असे नाही.
५. भेळ हा पदार्थ असा आहे की जो करणे कंटाळवाणे व खाणे सुटसुटीत व रम्य आहे. त्यामुळे घरात भेळ करण्यामुळे झालेला पसारा भेळ नकोशी किंवा भय्याखालोखाल वाटण्यास जबाबदार ठरतो तर भय्याकडे नुसते पंधरा वगैरे रुपये दिले की आपण चोचले पुरवून व अर्धे पोट भरून निघू शकतो.
 
आता मला सांगा... हा भय्या म्हणजे काय? आमच्याकडे भेळ बनवणारी माणसे मराठी असतात. (निदान मला तरी फक्त मराठीच माणसे दिसली आहेत. )