व्याकरणाच्या चुकांबद्दल क्षमस्व!
भलतेच! यात क्षमा कसली मागायची ? आधी चूक झाली आहे की नाही, ते माहीत नाही. आणि झाली असेलच तर ती अनवधानाने किंवा अज्ञानानेदेखील असू शकते . समजा तशी नसली, आणि अगदी हेतुपुरस्सर असलीच तर ती चांगल्या हेतूनेही असू शकते. अगदी वाईट हेतूने असलीच तर ती दुरुस्त करण्यासारखी असते किंवा नसते. आणि यानंतर चुकीचे मोजमाप, त्याने होणारे तोटे वगैरे. या सगळ्यांचा विचार होण्याआधीच माफ़ी मागायची म्हणजे जरा अतीच होते आहे. एवढे सौजन्य कौतुकास्पद असले तरी बरे नव्हे!