बेधुंद येथे हे वाचायला मिळाले:
"उठा आता. झोपायला काय वेळ काळ असतो की नाही. पाहूणे येतील आता, निदान त्यांच्यासाठी तरी थोडी आवराआवर कर.", मातोश्री.
डोक्यावरची उशी काढून, तोंड वासून मी आळस दिला आणि गेले ३ तास तोंडात अडकून पडलेल्या सहस्त्र कीटाणूंचा या जगातला प्रवेश निश्चीत केला. डोळे किलकिले करून दिशांचा अंदाज घेतला. झोपण्यापूर्वी माझ्या डाव्या बाजूला असलेली खिडकी आता उजव्या बाजुला कशी आली, अंगावरची चादर खाली का वर सरकली, बेडशीटने गादीची साथ सोडून कडेलोट कसा केला आणि माझी लाडकी बिप्स आजही स्वप्नात कशी नाही आली या नेहमी पडणारया प्रश्राचं ओझं घेऊन मी उशीवरून मान वर ...
पुढे वाचा. : काटकोन