श्री. सुभाष,

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.  आपण दिलेली नकाशांची संकेतस्थळे आणि आपले कुतूहल पाहून आनंद झाला (याला आगाऊपणा म्हणण्याची चूक करू शकणार नाही). संकेतस्थळांमधील सर्व नकाशे संक्षिप्त व माहितीपूर्ण आहेत.  विशेषतः "जर्मनीमधील शहरे दाखवणारा नकाशा"  माझ्या प्रवासाला जोड देईल असाच आहे.

बाकी, लायमन हे गाव  हाय्डलबर्ग (Heidelberg) पासून दहा - पंधरा कि.मी. अंतरावर आहे. गावाचे वैशिष्ट्य म्हणजे बोरिस बेकरचे हे जन्म गाव. तसे फारच लहानसे गाव. परंतू बोरिस बेकर म्हणजे जर्मनीतल्या लोकांचे आवडते आकर्षण. त्यामुळे हे गाव बऱ्याच जर्मन लोकांच्या माहितीचे. 

या लेखामध्ये मी बर्लिनच्या प्रवासातील जे अनुभव आले, ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय. हे सर्व अनुभव मनातच आहेत. छायाचित्रात टिपणे जरा कठीणच. लेखाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोयच.

परंतु माझ्याकडे बर्लिनची जी छायाचित्रे आहेत ती जरूर देईन. कदाचित बर्लिन शहराबद्दलही थोडेसे वेगळेसे लिहिता येईल.

-परेश